संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील संजना विरेंद्र जैस्वालने अत्यंत हटके क्रीडा प्रकारावर आपले लक्ष केंद्रीत करून यापूर्वी अनेक राष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत कांस्य, रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविले आहे. नुकताच रशियात वर्ल्डकप पार पडला. त्यातही तिने लक्षवेधी नेम साधून ३०० पैकी २२९ पॉइंट मिळविले आहेत. तसेच भारताकडून पहिली महिला युवा खेळाडू म्हणून देखील संजनाने सन्मान मिळविला आहे. तिची या क्रीडाप्रकारात १७ वी आंतरराष्ट्रीय रँक संजनाला मिळाली असून, तिने १८ मीटर रेंजच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आता क्रॉसबोच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे तिने सांगितले. शालेय जीवनापासूनच एअर रायफल क्रीडा प्रकारात तरबेज असलेल्या संजनाने नंतर तिचे करिअर हे क्रॉसबो क्रीडा प्रकारात करण्याचे ठरवले. क्रासबो हा क्रीडा प्रकार खूप खिर्चिक आहे. त्यासाठी लागणारे आयुध - क्रीडा साहित्य हे अत्यंत खर्चिक आहे. असे असतानाही तिने मास्को येथे अत्यंत कडाक्याच्या थंडीतही तेथे चांगले पॉइंट मिळविले. रशियात झालेल्या या स्पर्धेतसाठी फिल्डएंड टार्गेट शुटींग असोसिएशन आॅफ इंडियाने यासाठी मोलाचे सहकार्य केल्याचे संजनाने आवर्जुन सांगितले. यापूर्वी संजनाने आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेले होते. राष्ट्रीय पातळीवर क्रॉसबो स्पर्धा उत्तर प्रदेश मधिल इटावा येथे पार पडल्या. त्या स्पर्धेतील यशस्वी खेळांडूंची मास्कोत होणाऱ्या जागतिक क्रॉसबो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. ही निवड तिने सार्थक ठरविली आहे.यासाठी संजनाला चंद्रमोहन तिवारी, विशाल कटारीया, हमजा अलीखान, सुरज डेंबरे, यांचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितले. या क्रॉसबो क्रीडाप्रकाराकडे आपण पंजाबमधिल मित्रांच्या माध्यमातून वळलो असल्याचे ती म्हणाली.मास्कोत पार पडलेल्या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक आणावे ही मनोमन इच्छा होती. मात्र तेथपर्यंत पोहचता आले नाही. असे असले तरी आता पुढील वर्षी होणाºया क्रॉसबो वर्ल्डकपमध्ये ते नक्की आणू असा विश्वास तिने व्यक्त केला. त्यासाठी वडिलांचे मोठे सहकार्य मिळाले. या तिच्या यशामुळे ग्रामीण भागातूनही मोठे झेप घेणे शक्य होवू शकते.सुवर्णपदक मिळवेलचमास्को येथे पार पडलेल्या जागतिक पातळीवरील क्रॉसबो स्पर्धेत संजनाने मोठी झेप घेतली ही आमच्यासाठी तसेच भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेत जरी संजनाला सुवर्णपदाक मिळाले नसलेतरी पुढील वर्षी होणाºया जागतिक वर्ल्डचॅपिंयनशिप स्पर्धेत संजना नक्की देशासाठी सुवर्णपदक मिळविले असा विश्वास संजनाचे वडिल विरेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केला. रशियात संजनाला यश न आल्याने ती प्रचंड नाराज होती. मात्र तिला नाराज होऊ नये म्हणून आपण हिंमत आणि प्रेरणा देत असून, पुढील स्पर्धेत तिला यश मिळवेल असा विश्वास संजनाचे वडिल विरेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केला.
जालन्यातील संजना जैस्वालची वर्ल्डकपमध्ये भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:40 AM