जालना : स्वाक्षरी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फाईल पाठविण्यासाठी जालना जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायकास १० हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पकडले. दिलीप श्रीराम चव्हाण (३८, रा. शिवनगर) असे या वरिष्ठ सहायकाचे नाव आहे.तक्रारदारास मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती होण्यासाठीची फाईल शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत सीईओकडे पाठविण्यासाठी ५० हजार रुपये लागतील. तरच फाईल पूटअप करतो, अशी मागणी दिलीप चव्हाण यांनी केली.यानंतर तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. या तक्रारीवरुन ३१ मे रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, पंचासमक्ष दिलीप चव्हाण यांनी लाचेची मागणी केल्याचे निषन्न झाले.सापळा रचून १० हजार रुपये स्विकारतांना चव्हाण यांना रकमेसह पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस उप अधीक्षक रविंद्र निकाळजे, पोनि. काशिद, पोनि. व्हि. एल. चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के राऊत यांनी केली.
वरिष्ठ सहायक लाचेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:28 AM