लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या दहा वर्षापासून सिडको जालन्यात प्रकल्प उभाणार असल्याच्या चर्चेला पुन्हा नव्याने फोडणी मिळाली आहे. पूर्वी खतगाव परिसरात जागा संपादन करून ती पुन्हा रद्द करण्याची नामुष्की सिडको प्रशासनावर ओढवली होती. मात्र आता खा. रावसाहेब दानवे तसेच पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा करून जालन्यात आणण्यासाठी हालचाली केल्या. त्यानुसार जालना तालुक्यातील खरपुडी येथे या प्रकल्पासाठी जमीन संपादनासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.जालन्यात सिडको यावे यावे यासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे यांनी खतगाव परिसरात ३०० हेक्टर जागाही संपादित केली होती.मात्र प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन हा प्रकल्प तेथे होऊ नये अशी भूमिका घेऊन तत्कालीन आ. कैलास गोरंट्याल यांनी याला टोकाचा विरोध केला होता. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याची नोटीस सिडकोने काढली होती.आता खरपुडी येथील जवळपास ६१ गट क्रमांकांतून ३०० हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे.परंतु ही प्रक्रिया करताना सिडकोकडे आता निधी नसल्याने सिडको औरंगाबादप्रमाणे येथे घरे बांधून विकणार नाही, तर केवळ प्लॅन करून देणार आहे.हा प्लॅन तयार करण्यासाठी सिडको एक त्रयस्थ एजन्सी म्हणून काम करणार असल्याचे दिसून येते. हा प्लॅन तयार करताना ज्या शेतकऱ्याची समजा एक एकर जमीन संपादित केली तर, त्याला त्या बद्दल्यात केवळ जमीन विकसित झाल्यावर ९०० चौरसफुटाचा प्लॉट देण्यात येणार आहे.तसेच टीपीएस धोरणानुसार शेक-याने जमीन दिल्यास त्याला ४० टक्के दराने तेथे प्लॉट देण्यात येणार आहे. ही योजना गुजरातच्या धर्तीवर राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा जैसे थे...परिस्थितीची शक्यतासिडको येणार म्हणून मध्यम व नोकरदार वर्गात त्या नियोजित आणि सुसज्ज भागात घर घेण्यासाठीचे स्वप्न आतापासून रंगवत आहेत. मात्र सिडको जालन्यात केवळ आराखडा तयार करून देणार असल्याचे समजल्यावर अनेकांचा हिरमोड झाला. त्यातही जमीन संपादन होणे, नंतर त्याचा विकास आराखडा तयार होऊन तर त्यातील भूखंड विक्रीसाठी देण्यासाठी किमान तीन ते चार वर्षाचा कालावधी लागणार असल्याने हा प्रकल्प देखील एक पांढरा हत्ती होईल असे आतापासूनच बोलले जात आहे. जालन्यातील सिडको म्हणजे केवळ मृगजळ असल्याचेही अनेकांनी सांगितले.
सिडकोचा दुसरा अध्याय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:33 AM