शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सीड पार्कचे काम कासवगतीने...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:45 AM

४० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करू शकणारा आणि जवळपास ६ हजार कोटींची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या सीडपार्कचे काम कासवगतीने सुरु असून, हा प्रकल्प शासनाने मंजूर केला असला तरी आतापर्यंत केवळ मार्किंगच्या पलिकडे प्रकल्पाची फारशी प्रगती होऊ शकलेली नाही.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यातील ४० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करू शकणारा आणि जवळपास ६ हजार कोटींची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या सीडपार्कचे काम कासवगतीने सुरु असून, हा प्रकल्प शासनाने मंजूर केला असला तरी आतापर्यंत केवळ मार्किंगच्या पलिकडे प्रकल्पाची फारशी प्रगती होऊ शकलेली नाही. केंद्र शासनाच्या अनुदानाबाबत साशंकता व्यक्त करत सीड कंपन्या या प्रकल्पासाठी फारशा उत्सुक दिसून येत नाहीत.जालन्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीडपार्क उभारण्याची घोषणा केली होती. जालना ही बियाणे उद्योगांची राजधानी असून, या उद्योगाचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा, या दृष्टीने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. मध्यंतरी सीड पार्कच्या कामाला गती देण्यासाठी मंत्रालयात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. या प्रकल्पाची किंमत जवळपास १०९ कोटी रुपये असून, पानशेंद्रा परिसरात शासकीय मालकीची साधारण ३० हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. एमआयडीसीने हा प्र्रकल्प विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, प्लॉट मार्किंगच्या पलिकडेफारशी प्रगती या प्रकल्पाची होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, याबाबत अधिकारीही अनभिज्ञ आहेत. या प्रकल्पासाठी २२ प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पास केंद्र शासनाचे अनुुदान मिळण्याबाबत संभ्रम असल्याने सीड कंपन्यांनी पाठ फिरवली. त्यातच एमआयडीसीने नव्याने प्रस्ताव मागवले आहेत. यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.जालना तालुक्यातील पानशेंद्र येथे ९० एकरमध्ये होत असलेल्या सीडपार्कसाठी संपादित केलेल्या जागेबाबत खासगी शेतक-यांचे दावे आहेत. तसेच जुना आणि नवीन नकाशा यामुळेही प्रशासकीय पातळीवर वाद आहे. त्यामुळे सीडपार्कचे काम कासव गतीने होत आहेत. याला गती देण्यासाठी उच्चपदस्थ अधिका-यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.निर्णय फिरवला : मूळ उद्देश राहिला बाजूलासीड कंपन्या आणि महाबीज वा कृषी उद्योग विकास महामंडळ यांचा संयुक्त उपक्रम म्हणून सीडपार्कची उभारणी करण्याचा उद्देश शासनाचा होता. यात केंद्र शासनाचे ५० कोटी, राज्य शासनाचे २५ कोटी आणि उर्वरित रक्कम सीड कंपन्यांनी त्यांचा वाटा म्हणून भरायची होती. मात्र, कॅबिनेटच्या बैठकीत एमआयडीसीने पार्क विकसित करुन तो कंपन्यांना देण्याचे ठरले. जॉइंट व्हेंचरद्वारे शेतकºयांना सीडच्या माध्यमातून फायदा मिळवून देण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाState Governmentराज्य सरकारagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र