लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या काही महिन्यांमध्ये जालना शहर व जिल्ह्यात अनेकजण वाढदिवस साजरा करताना केककापण्यासाठी थेट तलवार, खंजीरचा उपयोग करत असल्याचे दिसून आले. या सदंर्भात पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या कडेही बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश देत संबंधित प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्याची सूचना केली होती. त्यानुसार बदनापूर तालुक्यातील एका इसमाच्या वाढदिवसासाठी वापरलेल्या तलवारीसह एकाला ताब्यात घेतले.जालना शहरातील विविध भागामध्ये रस्त्यावर बँड लावून तसेच मंडप उभारून वाढदिवस साजरे करण्याचा नवीन ट्रेंड रूजला आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाचा केककापण्यासाठी चक्क तलवार आणि खंजीरचा उपयोग केला जात असल्याचे दिसून आले.ही बाब गंभीर असून, यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह परिसरातील शांतता भंग होत होती. याच्या तक्रारी नागरिकांनी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्याकडे केल्या होत्या.त्यानुसार मंगळवारी ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानुसार बदनापूर तालुक्यातील धामनगाव येथील अनिल रगडे यांनी त्यांचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केला. त्याला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला होता. यावेळी राजूर परिसरातून मोटारसायकलवरून एक इसम तलवार घेऊन जाताना पोलिसांना आढळून आला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, अमोल दिलीप मगरे ने रगडे यांना वाढदिवसासाठी तलवार पुरवल्याची कबूली दिली. त्याला ताब्यात घेऊन तलवार जप्त करण्यात आली. जालना शहर व परिसरात असे रस्त्यावर तलवारीने केककापून ते फेसबबुकर टाकल्यास त्या संबंधिता विरूध्दही कारवाई होणार असल्याचे गौर यांनी सांगितले.
केक कापण्यासाठी वापरलेली तलवार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:05 AM