जालना : मालमत्ता कर वसुली वाढविण्यासाठी नगरपालिकेने थकबाकीदारांच्या मालमत्तेची जप्ती मोहीम हाती घेतली आहे.२३ हजारांचा कर थकविल्या प्रकरणी सोमवारी योगेश्वरी कॉलनी परिसरातील एका प्राचार्याच्या घरातील रुमची जप्ती करण्यात आली. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक नारायण बिटले, कर निरीक्षक शोएब कुरेशी, विनोद कुरील, बी.टी. चव्हाण, रमेश शिंदे, अमजद खान, मच्छिंद्र सतकर यांनी ही कारवाई केली. थकबाकीदारांनी आपल्याकडील कर भरून जप्ती टाळावी. अन्यथा जप्त मालमत्तेचा लिलाव करून थकित कर वसूल केला जाईल, असे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.
वसुली वाढविण्यासाठी जप्ती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:28 PM