लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुरुवारी निकाली काढली. यात निवड श्रेणीची ७० तर वरिष्ठ श्रेणीच्या ४० प्रकरणांचा समावेश आहे.मागील दहा वर्षांपासून निवड श्रेणीची प्रकरणे प्रलंबीत होती. तर दीड वर्षांपासून वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे प्रलंबीत होती. शिक्षक संघटनांकडून वारंवार प्रकरणे निकाली काढण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी शिक्षक संघटनांनी आंदोलनेही केली. परंतु, शिक्षकांच्या हाती निराशाच लागली.काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी शिक्षकांचे निवड वेतनश्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रकरणे विधान परिषद आचारसंहिता संपताच निकाली काढू, असे आश्वासन शिक्षकांना दिले होते.अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा व शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी गुरुवारी ही प्रकरणे निकाली काढली आहेत. यात निवड श्रेणीची ७० तर वरिष्ठ श्रेणीच्या ४० प्रकरणांचा समावेश आहे. शिक्षकांनी बारा वर्ष एकाच वेतनश्रेणीत सेवा केल्यानंतर चट्टोपाध्याय ही नवीन वेतनश्रेणी मिळते. तर एकाच वेतनश्रेणीत २४ वर्ष सेवा केलेल्या शिक्षकाला निवड श्रेणी ही वेतनश्रेणी मिळते.ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ, उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे, बाळासाहेब खरात, उपाधीक्षक सेवलीकर, कार्यालयीन अधीक्षक रामेश्वर राख, विभागप्रमुख पंजाब खिल्लारे आदींनी प्रयत्न केले.प्रशासनाच्या या कामगिरीचे यांचे प्रहार संघटनेचे संतोष राजगुरू, रमेश फटाले, अमोल तोंडे, ए. आय. मोमिन, सोमनाथ बडे, बालाजी माने, लहू राठोड, फेरोज बेग, राजेंद्र लबासे, बी.आर. काळे, सुरेश धानुरे, संदीप पितळे, कैलास गवळी, संतोष वाघमारे, गणेश लादे, शिवाजी आडसुळे, रामेश्वर दहिवाळ, फारूख सय्यद, दत्ता वाघमारे, गोविंद नाईक, मुकेश गाडेकर, नामदेव वीर, नामदेव गिते, गिरिधर राजपूत, एस. एस. जाधव आदींनी स्वागत केले.
निवड, वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे काढली निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:27 AM