यामध्ये लिंबूवर्गीय फळपिकांचे विविध वाण व रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष मुरकुटे, तसेच शेंडे- कलम पध्दत या विषयावर डॉ. एन. विजयकुमारी हे मार्गदर्शन करणार असून, लिंबूवर्गीय फळपिकांचे विविध खुंट व फळझाडांची लागवड यावर शास्त्रज्ञ डॉ. आर. के. सोनकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे या आधीच शेतकऱ्यांना या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आल्याचे डॉ. एस.व्ही. सोनुने यांनी सांगितले.
जालना : तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत मोसंबी लागवड आणि तंत्रज्ञान या विषयावर गुरुवारी ऑनलाइन परिसंवाद आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यामध्ये लिंबूवर्गीय फळपिकांचे विविध वाण व रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष मुरकुटे, तसेच शेंडे- कलम पध्दत या विषयावर डॉ. एन. विजयकुमारी हे मार्गदर्शन करणार असून, लिंबूवर्गीय फळपिकांचे विविध खुंट व फळझाडांची लागवड यावर शास्त्रज्ज्ञ डॉ. आर. के. सोनकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे या आधीच शेतकऱ्यांना या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आल्याचे डॉ. एस.व्ही. सोनुने यांनी सांगितले.