डॉ. बद्रोद्दीन हे उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष होते. या अंतर्गत त्यांनी मुस्लिम समाजातील मुला-मुलींना शिकण्यासाठी प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पुढाकार घेतला. जालना शहरातील सर्वात ज्येष्ठ डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस पदवी घेतली होती. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रांत त्यांचे मोठे योगदान होते. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी कार्य केले. समाजात शांती आणि एकोपा राहावा, या दृष्टीने सर्वधर्मसमभाव या तत्त्वाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्यावर बुधवारी रात्री शेरसवार कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माेहंमद इफ्तेकारूद्दीन यांचे ते वडील होत. डॉ. बद्रोद्दीन यांच्या निधनाने समाजात एक पोकळी निर्माण झाल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बद्रोद्दीन यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:32 AM