जालना : विधिसेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने शनिवारी न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३५० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.सकाळी दहा वाजता लोकअदालतचे उदघाटन झाले. या वेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नीरज पी. धोटे, सचिव एन.व्ही. विरेश्वर, जिल्हा सरकारी वकील अॅड. विपुल देशपांडे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस.एम. चाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यामध्ये प्रलंबित दिवाणी, फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात, धनादेश प्रकरणे, बँकेची प्रलंबित व दावा दाखलपूर्व वसुली, कौटुंबिक वाद, बीएसएनएलची दावा दाखलपूर्व पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. दहा पॅनलने लोकअदालतीचे काम पाहिले. प्रकरणांच्या तडजोडीतून सात कोटी ३३ लाख, ९६ हजार २१२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. पॅनल प्रमुख म्हणून अॅड. जी.एन.मोरे, अॅड. अंकुश लकडे, अॅड. एल.एम. एखंडे, अॅड. वैभव खरात, अॅड. एस.एल. बोर्डे, अॅड. महेंद्र साळवे, अॅड. हर्षद भावगत, अॅड. अमजद पठाण, अॅड.मुद्दस्सर सय्यद, अॅड.एस.जे. मगरे, अॅड. जे.बी.बडवे, अॅड.अरुणा भिसे, अॅड. रोजकमल ओव्हाळ, अॅड. आर.ए. चव्हाण, अॅड. व्ही. एस. वैद्य, अॅड. रेखा काळे, अॅड. बी.एस.मंत्री, अॅड. अरविंद मुरमे यांनी काम पाहिले.
लोकअदालतीमध्ये ३५० प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:34 AM