लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बारावीचे निकाल जाहीर झाले असून, नुकताच सीईटी तसेच नीट परीक्षेचे निकालही आता लागले आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व जागा भरतील अशी अपेक्षा आहे. यंदा अभियांत्रिकीसह औषधनिर्माण, कृषीशी संलग्न अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एकाच छता खाली ते घेता यावेत म्हणून सेतू सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.जालन्यात मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय असून, येथे मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल तसेच सिव्हील आणि कॉप्युटर इंजिनिअरींगच्या जवळपास २४० जागा आहेत. त्यासाठी येत्या आठवड्यात प्रवेशासाठीच अधिसूचना निघणार असून, यंदा शासनाने विद्यार्थी तसेच पालकांना प्रवेश घेतांना अडचणी येऊ नयेत म्हणून सेतू सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार जालन्यात आमच्या महाविद्यालयास हे सेतू केंद्र मंजूर झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस.के. बिरादार यांनी दिली विशेष म्हणजे या सेतू सुविधा केंद्रावरच औषध निर्माण शास्त्र, कृषी अभियांत्रिकीसाठी प्रेवशासाठीचे सर्व ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यंदा इंजिनिअरींगला गेल्यावेळपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतील अशी अपेक्षा असून, गेल्यावर्षी आमच्या महाविद्यालयाच्या जवळपास ६० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहेत.गेल्यावर्षी आमच्या महाविद्यालयात १०० पेक्षा अधिक जागा रिक्त होत्या. त्या यंदा राहणार नाहीत असेही बिरादार म्हणाले.आयटीआय सज्ज : दहावी निकाला आधी प्रवेशराज्य सरकारने गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही इयत्ता दहावीचा निकाल लागण्या आधीच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गुरूवारपासून ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे, अशांचे रजिस्ट्रेशन निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे.दरम्यान जालना जिल्हयात आठ शासकीय आणि चार खासगी आयटीआय आहेत. जालन्यातील आयटीआयमध्ये यंदा २२ जागा कमी झाल्या आहेत. असे असले तरी ३९२ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ट्रेडला प्रवेश घेता येणार असल्याची माहती आयटीआयचे प्राचार्य देविदास राठोड यांनी संपर्क साधला असता दिली.
अभियांत्रिकीसाठी सेतू सुविधा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:27 AM