जालना : औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी सोमवारी जालना जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालयात मतदान पार पडले. एकूण २७२ पैकी २६५ जणांनी मतदानाचा हक्क बजावाला. जालन्यातील काँग्रेसच्या सहा तर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने मतदानाला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शिवसेनेने या सर्वााना गळाला लावल्याची चर्चा दिवसभर शहरात होती.जालना येथील तहसील कार्यालयात हे मतदान पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, प्रभारी तहसीलदार गणेश पोलास यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती. दुपारी बारावाजेनंतर मतदान केंद्रावर काँग्रेस तसेच शिवसेना,भाजपचे नगरसेवक पोहचले होते. शिवसेनेचे नगरसेवक एका खासगी गाडीतून प्रथम जि.प. अध्यक्षांच्या शासकीय निवास्थानी एकत्रित आले होते. यावेळी जि.प.चे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, नगरसेवक विष्णू पाचफुले, संजय खोतकर हे सोबत होते. तर भाजपकडून उपाध्यक्ष भास्कर दानवे, गटनेते अशोक पांगारकर आदींची उपस्थिती होती.काँग्रेसचे नगरसेवक हे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या समवेत मतदानासाठी आले होते. यावेळी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना घोषणा देण्यापासून थांबवले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.प्रारंभी काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवकांना एकत्रित बोलावण्यात आले होते. परंतू सहा नगरसेवकांचा मोबाईल रेंज बाहेर असल्याने काँग्रेसच्या मनात तेथेच पाल चुकचूकली.यावेळी शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत आदींची उपस्थिती होती.निवडणूक : काँग्रेसचे सहा, राकॉचा एक नगरसेवक गैरहजरजालना शहरातील मालनबाई दाभाडे, सुमनबाई हिवाळे, हरिष देवावाले, मिनाबाई काबलिये, प्रिती कोताकोंडा, मोहमंद नजीब या सहा काँग्रेसच्या तर फारूक तुंडीवाले हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. या सात जणांनी मतदान न केल्याने त्यांना शिवसेनेने गळाला लावल्याची चर्चा होती. परंतु या सातही जणांशी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न केलापरंतु त्यांचा मोबाईल रेंज बाहेर असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी चार वाजेपर्यंत या नगरसेवकांशी संपर्क साधल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. दरम्यान पक्षाचा व्हीप डावलणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
सात नगरसेवकांची मतदानाला दांडी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:31 AM
औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी सोमवारी जालना जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालयात मतदान पार पडले. एकूण २७२ पैकी २६५ जणांनी मतदानाचा हक्क बजावाला.
ठळक मुद्देशिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा : सात ठिकाणी शंभर टक्के मतदान