लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : येथील रामनगर वार्ड क्र. ५ मधील रस्त्यांवर अस्वच्छ पाणी तुबंल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.पावसाळ््यापूर्वी गावातील नाल्यांची साफसफाई करणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाकडून काही भागांचीच सफाई करण्यात आली. काही भाग तसाच सुटल्याने या भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. तर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मलेरिया, थंडी- तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.रस्त्यांची सापसफाई करून धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नारायण हारेर, जमीरदिन बागवान, रामेश्वर सुपेकर, फारुख बागवान, राहुल कांबळे, धीरज परदेशी, योगेश दगडफोडे, इसाक तांबोळी, नीलेश परदेशी, सूरज परदेशी, बाबासाहेब रत्नपारखे, संतोष परदेशी, प्रमोद इंगळे, गीतालाल परदेशी, एकनाथ धोत्रे, बाळू धोत्रे, राहुल धोत्रे, आबासाहेब माने, विनोद इंगळे, मन्नू परदेशी, बाजीराव शिंदे, अर्जुन पवार आदींनी केली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
शहागडमध्ये रस्त्यावर अस्वच्छ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:15 AM