शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

शरद पवारांच्या दौऱ्यामागे; शिवसेनेच्या हिकमत उढाणांना शह देण्यासाठी राजेश टोपेंचा आटापीटा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 4:58 PM

शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांनी टोपेंच्याच मतदार संघातील मुरमा येथे चार महिन्यांपूर्वी गुळापासून पावडर निर्मिती करणाऱ्या खासगी कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली होती.

जालना : जिल्ह्यातील शिल्लक उसाचा मुद्दा गंभीर बनला आहे, हे खरे आहे. तो जास्तीत जास्त प्रमाणात गाळप व्हावा यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी केलेले प्रयत्नदेखील शेतकऱ्यांसाठी निश्चितच महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे सर्वसामान्यांना दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढीसह २५० कोटींच्या नवीन साखर कारखान्याची घोषणा ही दिलासादायक वाटू शकते. आणि तशी आहे देखील. परंतु पडद्याआड झाकून पाहिले असता, एकप्रकारे टोपे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेते डॉ. हिकमत उढाण यांना यातून इशारा देत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पायाभरणीचा श्रीगणेशा केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जालना जिल्ह्यात दिवंगत सहकार महर्षी माजी खासदार अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेवून, दोन सहकारी साखर कारखाने, शिक्षण संस्था, सूत गिरणी, काळाची गरज लक्षात घेत जालन्यात अभियांत्रिकी महाविद्याल तसेच बँक उभारून मोठी क्रांतीच केली. शिस्तबध्द पध्दतीने या संस्थांची वाटचाल ही देखील महत्वाची बाब होती. तोच वारसा अंकुशराव टोपे यांचे पुत्र आणि सलग पाचवेळेस आमदार, मंत्री राहिलेले राजेश टोपे हे देखील खंबीरपणे चालवित आहेत. काळाची गरज ओळखून राजेश टोपे हे निर्णय घेतात. सध्या जालना जिल्ह्यात १६ लाख टन ऊस अतिरिक्त बनला आहे. तो गाळपासाठी दररोज साडेसात हजार गाळप करणारा तिसरा कारखाना निर्मितीची घोषणा त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत केली. आणि त्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासनही पवारांसह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावर यांनी जाहीरपणे दिली. यात टोपेंचा प्रांजळपणा आणि शेतकऱ्यांप्रति असलेली त्यांची निष्ठा जरी दिसत असली तरी त्याला राजकीय किनारही आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उढाण यांनी टोपेंच्याच मतदार संघातील मुरमा येथे चार महिन्यांपूर्वी गुळापासून पावडर निर्मिती करणाऱ्या खासगी कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यामुळे तो उढाण यांचा कारखानाही उसाशी संदर्भातील असून, या भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. आणि आपोआप उढाणांना शेतकरी त्यातून जेाडता येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन टोपे यांनी नवीन कारखान्याची घोषणा केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

टोपेंचा विरोधकांना धोबी पछाड...आज घडीला राजेश टोपे यांना राष्ट्रवादीतून आव्हान देणारे दुसरे नेतृत्व नाही. सलग पाचवेळेस त्यांनी आमदार म्हणून केलेले कार्य तसेच त्यांच्या वडिलांनी संस्थात्मक पध्दतीने बांधून ठेवलेली जनशक्ती ही टोपेंची बलस्थाने आहेत. त्यांना सध्या तरी पक्षासह अन्य पक्षातूनही टक्कर देणारा नेता नाही. या आधी दिवंगत नेते अंकुशराव टोपे यांना माजी आमदार ॲड. विलास खरात यांनी चांगलीच टक्कर दिली होती. खरात यांनी अंकुशराव टोपेंप्रमाणेच शैक्षणिक संस्था, सहकारी सूत गिरणी, बँकांच्या माध्यमातून मोठे साम्राज्य उभे केलेले आहे. परंतु खरात हे सध्या भाजपमध्ये असून, घनसावंगी मतदार संघ हा युतीत शिवसेनेला सुटला होता. परंतु आता युती नसल्याने खरातांच्या भूमिकेलाही महत्त्व येणार आहे. डॉ. हिकमत उढाण यांनी २०१९ च्या निवडणुकीत टोपेंना अक्षरश: झुंजवले होते. हे टोपे सहजासहजी विसणार नसून, त्या दृष्टीनेच त्यांनी तिसऱ्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवून उढाणांना शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालना