शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

घरकुल अनुदानासाठी संघर्ष तीव्र करणार : शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:09 AM

बांधकाम कामगारांना हक्कच घर बांधणीसाठी शासनाने पाच लाख रुपये अनुदान द्यावे, यासाठी सिटू संघर्ष तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन राज्य महासचिव एम.एच. शेख यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : स्वत: च्या रक्ताचं पाणी करून जगासाठी सावली तयार करणाऱ्या बांधकाम कामगारांना हक्कच घर बांधणीसाठी शासनाने पाच लाख रुपये अनुदान द्यावे, यासाठी सिटू संघर्ष तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन राज्य महासचिव एम.एच. शेख यांनी केले.सिटू प्रणित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने रविवारी कुंभार पिंपळगाव येथे घरकुल हक्क परिषद घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसचिव अण्णा सावंत, राज्य कार्याध्यक्ष भरमा कांबळे, राज्य कोषाध्यक्ष अब्राहम कुमार, जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, लाला बावटाचे जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद आर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, प्रारंभी अंबड पाथरी टी पॉइंट ते मंगल कार्यालय अशी भव्य कामगार रॅली काढण्यात आली.कामगाराच्या घरकुलासाठी कामगार कल्याणकारी मंडळाकडून दोन लाख, केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून अडीच लाख तर राज्य सरकारकडून पन्नस हजार असे घरकुल अनुदान म्हणून बांधकाम कामगाराचे घर बांधण्यासाठी अनुदान म्हणून पाच लाख रुपये देण्याची महत्वाची मागणी घरकुल हक्क परिषदेतून करण्यात आली. तर यासाठी राज्य स्तरावर आंदोलनही करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी आपल्या भाषणातून शेख यांनी दिला. तर जालन्यातील एका मोठ्या मंत्र्याच्या पी ए ने कामगारांच्या लाभासाठी कामगार म्हणून नोंदणी केली आहे.बोगस लाभार्थ्यांबाबत सिटू शांत बसणार नाही, असे ही शेख यांनी यावेळी सांगितले. बांधकाम कामगारांसह सर्वच क्षेत्रातील कामगारांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन अण्णा सावंत यांनी आपल्या भाषणातून केले.उपस्थितांनी सत्ताधारी, विरोधकांवर सडकून टीका करीत विधानसभा निवडणुकीत कामगार संघटनेकडून घनसावंगी मतदार संघातून गोविंद आर्द्रड निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.जालना जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयातील सहायक कामगार अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे कामगारांना माहितीसह योजनांची अंमलबजावणी, फायदा मिळण्यास उशीर होत आहे.कामगार नोंदणीबाबत ही वेळ लागत आहे. त्यामुळे सहायक कामगार अधिकारी पद भरण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासाठी वेळप्रसंगी आंदोलन ही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.कामगाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध प्रकारच्या योजना आहेत. तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून सेफ्टी किटचे ही वितरण केले जात आहे. यासाठी कामगारांनी आपली नोंदणी करून विविध योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन परिषदेत करण्यात आले.

टॅग्स :Morchaमोर्चाLabourकामगारagitationआंदोलनHomeघरgovernment schemeसरकारी योजना