लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : सध्या कडाक्याच्या थंडीची लाट आहे. अशा बोचऱ्या थंडीतसुद्धा आपल्या झोपडीतून उठून घरोघर शिळे अन्न मागून ते आपल्या भावंडांना भरविण्याचे काम एका चिमुरडीने केल्याची घटना शहरात घडली आहे़भोकरदन शहराच्या परिसरात अनेक कुटुंबे येऊन वास्तव्य करीत आहेत. त्यामध्ये काही जण, खेड्या- पाड्यात जाऊन प्लास्टिकचे हंडे विक्री करतात, काही जण घिसडी काम, तर काही जण कचरा गोळा करून आपला उदरनिर्वाहाचे काम करीत आहेत. शहरात गावालगतच्या शासकीय जमीन किंवा रिकाम्या जागेच्या ठिकाणी या कुटुंबांनी आपली झोपडी उभारल्या असून, पुरूष व महिला दिवसभर घराबाहेर निघून जातात. तर त्यांची मुले सकाळी गावात घरोघरी जाऊन रात्रीचे शिळे अन्न जमा करून ते आपल्या झोपडीत जेवण करतात. शिवाय आपल्या आई- वडिलांनासुद्धा ते अन्न पुरवितात.सकाळी ८ वाजेच्यासुमारास एक १० वर्षांची मुलगी आपल्या लहान दोन भावंडांसोबत गावात घरोघरी फिरून शिळे अन्न जमा करीत होती. तिच्याजवळ एक स्टीलची केटली व पोळ््या किंंवा भाकरी घेण्यासाठी एक पिशवी सोबत होती. काही महिलांनी या मुलांना रात्रीचे शिळे अन्न दिले होते. ते घेऊन ही मुलगी सकाळी ८ च्या दरम्यान कोवळ््या उन्हाच्या तिरपीमध्ये बसून सोबतच्या पिशवीतून पोळी व भाकरी बाहेर काढून आपल्या सोबतच्या दोन भावंडांना तिने जेवण भरविले. यामुळे परिसरातील अनेकांचे लक्ष तिने वेधून घेतले होते.
‘तिने’ भरविला भावंडांना मायेचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:39 AM