पुढे बोलताना अर्जुन खोतकर यांनी आंबेकरांच्या या उपक्रमाचे कौतुक करून कोरोनाने अनेक कुटुंब उदध्वस्त केली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख या नात्याने आंबेकर यांनी जालन्यानंतर आज बदनापूरमध्ये हा गरजूंना मदतीचा कार्यक्रम ठेवून मोठे समाजकार्य केले आहे.
यावेळी आंबेकर यांनी सांगितले की, जालन्यानंतर बदनापूर तालुक्यातील कुटुंबाचे सर्वेक्षण शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले. येथेही अनेक कुटुंब आर्थिक संकटात असल्याचे दिसून आले. यामुळे आपण स्वत: यात खारीचा वाटा म्हणून रोख मदतीसह कपाशीच्या दोन बियाणांचे वाटप केले आहे. एकूणच कोरोना काळ हा अत्यंत भयावह होता. त्यातून सावरताना आजही आपली दमछाक होत आहे. कुठल्याही राजकीय लालसेतून हा कार्यक्रम नसून केवळ सामाजिक भान म्हणून ही मदत असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार उपजिल्हाप्रमुख भगवान कदम यांनी मानले.
फोटो