मंठा : कोरोना काळात चांगली माणसे गेली, त्याचे निश्चितच दुःख आहे. पण, या काळात शिवसैनिकांनी रुग्णांना व नातेवाइकांना मानसिक आधार देण्याचे काम केले. सर्वसामान्यांचे दुःख वाटून घ्यायचे काम शिवसेना सातत्याने करीत आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे खासदार संजय जाधव यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क मोहीम सुरू आहे. यानिमित्त मंठा येथे बुधवारी खासदार संजय जाधव यांच्या निधीतून अद्ययावत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तसेच शिवसेना महिला मेळावा व संवाद अभियान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी खासदार संजय जाधव यांच्यासह महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, परभणीचे संपर्कप्रमुख राम खराबे, संजय साडेगावकर, रणजीत गजमल, पंढरीनाथ धोंडगे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सविता किवंडे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, तालुकाप्रमुख अजय अवचार, अशोक आघाव, माजी सभापती संतोष वरकड, शहरप्रमुख प्रल्हाद बोराडे, महिला उपजिल्हासंघटक बेबी पावसे, भुसारे, गया पवार, नगराध्यक्ष नितीन राठोड, डिगांबर बोराडे, जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड, पंचायत समिती सदस्य बाबाराव राठोड, मधुकर काकडे, तुळशीराम कोहीरे यांची उपस्थिती होती.
खासदार जाधव म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेना पक्षात आहे. शेतकऱ्यांची अवहेलना होत असेल तर शिवसेना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आगामी मंठा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावा. मी शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपये निधी देणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाप्रमुख बोराडे हे शिवसेनेचे काम अत्यंत निष्ठेने करतात. त्यांनी २०२४ ची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी ठेवावी, असेही ते म्हणाले. जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी मंठा तालुक्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका दिल्याबद्दल खासदार जाधव यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला नगरसेवक बालासाहेब बोराडे, डिगांबर बोराडे, दीपक बोराडे, इलियास कुरेशी, अरुण वाघमारे, प्रदीप बोराडे, नीरज सोमानी, अचित बोराडे, संजय नागरे, पप्पू दायमा, शहरप्रमुख गजानन बोराडे, महादेव खरात, विभागप्रमुख रामेश्वर शिंदे, बबन शेळके, विष्णुपंत खराबे, दासुपंत खरात, अनू काकडे, रुक्मिणी घोडके, चंदा निर्मळ, शोभा अवचार, नंदा घोडके, सविता नागरे, सुलोचना इंगळे, चंदा सोनवणे, छाया बरसाले, सरस्वती वाघमारे, सोनी पवार, वजीर पठाण, संदीप वायाळ, आकाश मोरे, किरण सूर्यवंशी, अशोक घारे आदींची उपस्थिती होती.
210721\img-20210721-wa0034.jpg
अकलुज येथे एकता बहुउद्देशीय संस्थेच्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष जावेदभाई तांबोळी व इतर