लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.राजूरराजूर : राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी तरूणांनी शिवरायांचा जयजयकार केला. तसेच छत्रपती शिवाजी चौकात शिवरांयाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जि.प.सदस्य कैलास पुंगळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, शिवाजी पुंगळे, गणेश साबळे, सांडू पुंगळे, मुसा सौदागर, श्रीरामपंच पुंगळे, निवृत्ती पुंगळे, आप्पासाहेब पुंगळे, रामेश्वर सोनवणे, आकाश पुंगळे, विनोद डवले, विष्णू पुंगळे, गणेश पुंगळे, अनिल पुंगळे, संतोष मगरे, रतन ठोंबरे, ज्ञानेश्वर बावणे, मोहिनीराज मापारी, उमेश पुंगळे, विनोद पुंगळे यांच्यासह तरूण मोठया संख्येने सहभागी झाले होते.गणपतदादा शाळाराजूर : संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, प्राचार्या आशा पुंगळे यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षकांनी शिवरायांच्या कार्याला भाषणातून उजाळा दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, प्राचार्या आशाताई पुंगळे, विकास मिसाळ, भगवान पुंगळे, दत्ता ठोबरे, विष्णू मिसाळ, कैलास बावस्कर, सतीश टोम्पे यांच्या शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.जाफराबाद येथील शोभायात्रेने वेधले लक्षजाफराबाद : शिवजयंती उत्सव समिती जाफराबाद यांच्या वतीने जाफराबाद शहरात शिवजयंती निमित्य ढोलताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नामाचा गजर करत टाळ मृदंगाच्या ठेका धरत भजन, फुगडीमध्ये उत्स्फूर्तपणे हजारोंनी सहभाग घेतला.शोभायात्रेला अहिल्यादेवी होळकर चौकामधून प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या वेळी मिरवणूक मुख्य रस्त्यावरून जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला. आ.संतोष दानवे,माजी आ. चंद्रकांत दानवे, उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, सभापती साहेबराव कांनडजे, शिवसेनेचे रमेश गव्हाड, तालुका अध्यक्ष गोविंदराव पंडित, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण, दीपक पाटील, सुरेश गवळी, जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के, संतोष लोखंडे, शेषराव कळंबे, सुरेश दिवटे, रमेश चव्हाण, रामधन कळंबे, उत्सव समितीचे अध्यक्ष नीलेश जाधव, प्रभू गाढे, राजेश म्हस्के, निवृत्ती दिवटे, संदीप कड, दामू वैद्य, कैलास दिवटे, संजय गौतम, विजय सोनवणे, राजेश म्हस्के, कुंडलिक मुठे,नाना पंडित,साहेबराव मोरे,अनिल बोर्डे,जगन पंडित, प्रा.सिध्दार्थ पैठणे,प्रकाश राऊत,वामन दांडगे या सह शिवप्रेमींची उपस्थिती होती.
शिवाजी महाराज जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:17 AM