जालना : नगर येथील श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या व्यक्तव्याच्या शनिवारी शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सेनेच्या पदाधिका-यांनी शिवाजी पुतळा चौकात निदर्शने करीत छिंदम विरोधात घोषणाबाजी केली.यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, एका जबाबदार पदावर असणा-या पदाधिका-याने महाराजांबद्दल असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. श्रीपाद छिंदम याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. युवासेनेचे जगन्नाथ काकडे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, आत्मानंद भक्त, हरिहर शिंदे यांनी घोषणाजी करत निषेध व्यक्त केला. काकडे म्हणाले, की अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणे म्हणजे हा सत्तेचा माज आहे. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता अशा पुढाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. यावेळी उपतालुकाप्रमुख बबनराव जाधव, शहर संघटक संदीप झारखंडे, उपशहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, नगरसेवक विजय पवार, संतोष सलामपुरे, परमेश्वर शिंदे, किशोर नरवडे, राजू सलामपुरे, अंकुश पाचफुले, गोपी गोगडे, अमोल ठाकूर, दुर्गेश काठोठीवाले, किशोर शिंदे, राजेश घोडे, सागर पाटील, सुमित पाटील, अरुण गिरी, कमलेश खरे, अल्पसंख्याक आघाडीचे शहर संघटक मुसा परसूवाले, कैलास मिसाळ, सुशील भावसार, गणेश तरासे, सखाराम लंके, गणेश लाहोटी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छिंदम विरोधात शिवसेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:06 AM