शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून युती सरकारचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:38 AM2019-08-20T00:38:50+5:302019-08-20T00:39:31+5:30

पूर परिस्थिती, मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासह बेरोजगारीकडे दुर्लक्ष करून गुन्हेगार, भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या भाजप पवित्र करून घेत आहेत, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केली.

Shivswaraj Yatra exposes alliance government | शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून युती सरकारचा पर्दाफाश

शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून युती सरकारचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देसभा : पवार, मुंढेंकडून सरकारचे वाभाडे

बदनापूर/भोकरदन : राज्य सरकारची महाजनादेश यात्रा ही मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी असून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वाद यात्रेतून ते स्वत:ला आगामी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करीत आहेत. पूर परिस्थिती, मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासह बेरोजगारीकडे दुर्लक्ष करून गुन्हेगार, भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या भाजप पवित्र करून घेत आहेत, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केली.
राष्टÑवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यभर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांवर टिकेची झोड उठविली जात असून या योजना कशा फसव्यात आहेत, हे उदाहरणांसह दाखवून दिले जात आहे. सोमवारी राष्टÑवादी काँग्रेसची शिवराज्य यात्रा अनुक्रमे बदनापूर आणि भोकरदन येथे पोहोचली होती. दोन्ही ठिकाणी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद या सभांना मिळाला.
यावेळी अजित पवार यांनी बदनापूर येथे बोलताना सांगितले की, भूलथापा मारून सरकार सत्तेवर आले आहे. आज बदनापूरमध्ये साधे बसस्थानकही नसून गेल्या पाच वर्षांत त्यांनी काय केले? असा प्रश्न केला. तसेच आमची सत्ता आल्यास तेलंगणाच्या धर्तीवर ७५ टक्के नोकºया या स्थानिकांना देण्याचा कायदा करू, असे त्यांनी सांगितले. १६ हजार शेतकऱ्यांनी सरकरच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पूरग्रस्त भागाला मुख्यमंत्री तसेच भाजपच्या नेत्यांनी चार दिवसांनंतर भेट दिली. यावरून ते किती संवेदनशील आहेत, हे लक्षात येते. युती सरकारने विकास कामे करून राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज केले असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. धनंजय मुंढे यांनी देखील भोकरदन आणि बदनापूर येथे सरकारच्या धोरणांवर सडकून टिका केली.यावेळी ते म्हणाले की, भाजप म्हणजे काशीमधील पाप धुण्याचा घाट झाला आहे. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे आरोप करून धमकावले जात आहे. या दडपशाहीमुळे अनेक दिग्गज नेते भाजपच्या कंपूमध्ये प्रवेश करीत असल्याचे मुंढे म्हणाले. भोकरदन येथील आ. संतोष दानवे हे दडपशाही करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तत्पुर्वी माजीमंत्री आ. राजेश टोपे, माजी आ अरविंद चव्हाण, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते, सुरेश खंडाळे, प्रकाश साळुंके, रविंद्र तौर आदिंसह अनेकांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलु चौधरी, सूत्रसंचलन बाळासाहेब वाकुळणीकर व आभार प्रदर्शन पांडुरंग जºहाड यांनी केले़

Web Title: Shivswaraj Yatra exposes alliance government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.