जालना : घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथील दोन शेतकऱ्यांचा अडीच एकर ऊस शॉर्टसर्किटने आज सकाळी जळून खाक झाला आहे. यात ठिबक यंत्रणाही जळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शिंदेवडगाव येथील दत्तात्रय भुतेकर व रवींद्र भुतेकर या दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अडीच एकर ऊसाची लागवड केली. पाण्याची बचत व्हावी, यासाठी त्यांनी ठिबक सिंचनही केले होते. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. यात त्यांचा अडीच एकर ऊस जळून खाक झाला. दरम्यान, आग लागताच आजू बाजूच्या नागरिकांनी धाव घेवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात ३ लाख रुपयांचे नुकसाने झाल्याचे दत्तात्रय भुतेकर यांनी सांगितले.