लोकमत न्यूज नेटवर्कजालना : क्रीडा स्पर्धेमध्ये जसे उत्साहाने सहभागी झाले. तसेच दैनंदिन कामांमध्येही उत्साही राहा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेचा शनिवारी राज्य राखीव दलाच्या मैदानावर समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, बीडचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी, नांदेडचे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर आयुक्त विजयकुमार फड, उपायुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त साज्ञा सावरकर, एसआरपीचे समादेशक भारत तांगडे, आरपीटीएसचे प्राचार्य पवार, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर आदींची उपस्थिती होती.डॉ. भापकर म्हणाले की, प्रशासनाचा कणा म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. प्रशासन गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी महसुलविभागामार्फत सातत्याने कार्य केले जात असून औरंगाबाद विभाग राज्यात सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. जलयुक्त शिवार, शेततळे, ५० हजार विहिरी, सातबारा, शेतकरी पीककर्ज वाटप यामध्ये मराठवाडा प्रथम क्रमांकावर आहे. सर्व खेळाडूंनी तीन दिवस शांततेने क्रीडा व संस्कृतिक स्पर्धेत भाग घेवून खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय स्पधेर्चे नियोजन हिवाळी अधिवेशनानंतर कळविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जोंधळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
खेळाप्रमाणे कामातही उत्साह दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:04 AM
क्रीडा स्पर्धेमध्ये जसे उत्साहाने सहभागी झाले. तसेच दैनंदिन कामांमध्येही उत्साही राहा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
ठळक मुद्देपुरुषोत्तम भापकर : विभागीय क्रीडा स्पर्धेचा थाटात समारोप, क्रीडा प्रकारात नांदेड जिल्हा अव्वल