लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुकशुकाट कायम असून, बाजारपेठ बंद असल्याने ग्रामीण भागातील गर्दीही ओसरली आहे.परतूर तालुक्यात कोरोनाच्या धास्तीने रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. रेल्वे, बस व इतर खाजगी वाहतूक बंद असल्याने वर्दळही घटली आहे. पोलिसांची सारखी गस्त असल्याने विनाकारण रस्त्याने फिरणारे व गाड्या पळविणारे गायब झाले आहेत. केवळ जिवनावश्यक वस्तुंचीच दुकाने सुरू आहेत.गेल्या काही दिवसांपासून परतूर- आष्टी रस्त्यावरील रेल्वे गेट दहा मिनीटाला बंद होत होते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला होता. मात्र, दोन दिवसांपासून प्रवासी रेल्वे बंद असल्याने हे रेल्वेगेट कायमस्वरूपी उघडे आहे. केवळ मालगाडी आली तरच गेट बंद होत आहे.
परतूर शहरात शुकशुकाट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:45 PM