देऊळगावराजा तालुक्यातील वाकी गावातील अनेक भागांतील नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे अस्वच्छ पाणी स्त्यावरून वाहत आहे. काही भागात कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. अस्वच्छतेमुळे गावातील नागरिकांना विविध आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावात स्वच्छता मोहीम राबवावी, तुंबलेल्या नाल्या उपसाव्यात आदी मागण्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व ग्रामसेविकेकडे केली आहे. शिवाय अस्वच्छ भागातच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा वॉल्व्ह आहे. त्यामध्ये पाणी लिंक होते आणि तेच पाणी पाईपलाईनद्वारे गावाला सोडले जात आहे. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील या समस्या सोडवाव्यात, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु, संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने एका महिला सदस्यांचे पती विजय ढाकणे व इतरांनी शुक्रवारी चक्क रस्त्यावरील घाणीत बसून ग्रामसेविकेच्या कामकाजाचा निषेध केला. गाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
घाणीत बसून प्रशासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:32 AM