लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : धनादेश अनादरप्रकरणी भोकरदन येथील न्यायालयाने एकास सहा महिने शिक्षा व तीन लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली.याबाबत अॅड. विश्वास सपकाळ यांनी दिलेली माहिती अशी की, सांडू आनंदा चव्हाण (रा. आधारवाडी तांडा ता. सिल्लोड) याने श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना सिपोराबाजार यांच्याबरोबर गळीत हंगाम २००८-०९ मध्ये २ लाख ५२ हजार १८८ रूपये अॅडव्हान्स घेतला होता. त्यांच्याकडे कारखान्याची २ लाख ७ हजार ४०६ रूपये बाकी होती. तिच्या मागणीपोटी चव्हाण यांनी ५ मार्च २०१० चा औरंगाबाद जालना ग्रामीण बँक शाखा घाटनांद्र्याचा धनादेश दिला होता. मात्र, धनादेश अनादरित झाल्याने कारखान्याच्या वतीने भोकरदन न्यायालयात कलम १३८ एन आय अॅक्ट प्रमाणे प्रकरण क्रमांक ५०९/२०१० प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायाधीश भरत स. जगदाळे यांनी आरोपी सांडू चव्हाण याला सहा महिन्यांचा कारावास व तीन लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.या प्रकरणात कारखान्याकडून अॅड. विश्वासराव सपकाळ यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. राजेंद्र सपकाळ, अॅड. राहुल सपकाळ यांनी त्यांना मदत केली.
धनादेश अनादर प्रकरणी सहा महिने शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:53 AM