शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

... तर जालन्यात रावसाहेब दानवे जरांगेंचा पराभव करतील; भाजपाच्या मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 10:06 AM

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा पुढील १५ दिवसांत होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मराठा आंदोलनातील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत त्यांच्यावर जबरी टीका केली. जरांगेंच्या या भूमिकेवरुन हे आंदोलन राजकीय होत असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे. त्यातूनच, भाजपा नेते आशिष जाधव यांनी मनोज जरांगेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्थात, त्यावर जरांगेंनी स्पष्टीकरणही दिलं. मात्र, जालन्यात जरांगे विरुद्ध दानवे असा सामना रंगल्यास रावसाहेब दानवे जरांगेंचा पराभव करतीस, असे केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे.  

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यातूनच जरांगे यांनी आगामी लोकसभानिवडणूक लढवावी अशी चर्चाही होत असून भाजपा नेते आशिष देशमुख यांनी तर, ते महाविकास आघाडीकडून जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचा दावाच केला होता. मात्र, राजकीय चर्चेबाबत आणि भूमिकेबाबत जरांगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. तसेच, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन आणि आनंद आंबेडकरांच्या भेटीवरही त्यांनी मौन सोडले. माझा राजकीय मार्ग नाही, असे म्हणत जरागेंनी भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे जालन्यात जरांगे निवडणुकीला उभे राहिल्यास रावसाहेब दानवे त्यांचा पराभव करतील, असे केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे. 

जालना लोकसभा मतदारसंघातून जरी मनोज जरांगे पाटील हे उभे राहिले तरी भाजपचे नेते रावसाहेब दानवेच पुन्हा निवडून येतील, असं कराड यांनी म्हटलं आहे. ''रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. मतदार संघात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उमेदवार असले तरीही रावसाहेब दानवे यांचा विजय पक्का आहे. रावसाहेब दानवे हे जरांगेंना घाबरणार नाहीत,'' असं कराड यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीवर काय म्हणाले जरांगे

आनंद आंबेडकर यांच्या भेटीवर भाष्य करताना, प्रकाश आंबेडकर यांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं. पण, माझं त्यांना आदरपूर्वक म्हणणं आहे. माझा सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे, सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावं, याकडे आहे. माझा राजकीय मार्ग नाही, माझा सामाजिक मार्ग आहे. मी हा लढा समाजासाठी उभा केलेला आहे, असे म्हणत राजकीय भूमिका घेणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. जालना मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. मराठा समाजही तुम्ही निवडणूक लढवावी, अशी भूमिका घेत आहे, त्यासंदर्भाने प्रश्न विचारला असता. जर तरला उपयोग नाही, समाज माझा मालक आहे. पण, राजकारण हा माझा मार्ग नाही, ज्वलंत मुद्दा माझ्यासमोर सध्या फक्त आरक्षणचा आहे. समाजाचा प्रश्न हाच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाच आहे. गोरगरीब मराठ्यांचे पोरं, कष्टकऱ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत, असे म्हणत राजकीय भूमिका घेणार नसल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा