लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लायन्स क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले जातात. या अंतर्गत नेत्रतपासणी, गरजू रूग्णांना मदत, विद्यार्थी आणि त्यांच्या विकासासाठी राबविलेले उपक्रम यांचा त्यात समावेश असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी पुरूषोत्तम जयपुरिया यांनी केले.रविवारी लायन्स क्लब आॅफ लायन्सचा पदग्रहण समारंभ हॉटेल सेफ्रॉनमध्ये पार पडला. यावेळी शपथ प्रमुख पदाधिकारी जयपुरिया यांनी नूतन सदस्यांना शपथ दिली. नवीन कार्यकारिणीमध्ये रॉयल्सच्या अध्यक्षपदी बद्रीनारायण अग्रवाल, सचिव ओमप्रकाश दरगड, कोषाध्यक्ष उजवणे यांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लायन्सचे रिजनल चेअरमन मनोहर खालापुरे उपस्थित होते. याच कार्यक्रमात जयपुरिया यांनी या आधीच्या लायन्स क्लब परतूरच्या पदाधिकाऱ्यांना शपथ देताना ‘केक’ थिम तर २० वर्षे जुना असलेल्या रिसोड येथील क्लबच्या पदाधिकाऱ्यांना शपथ देताना ‘पझल’ ही मुख्य संकल्पना वापरण्यात आली. तर रविवारी झालेल्या कार्यक्रमात ‘बुके’ ही अनोखी संकल्पना मांडून जयपुरिया यांनी नूतन पदाधिका-यांना शपथ दिली.जयपुरिया यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी आपण पुढाकार घेऊन जालना रॉयल्स क्लबची स्थापना केली होती. यावेळी ब्रिजमोहन लड्डा, सुरेखा दरगड, सुभाष गादिया, गोवर्धन करवा, पन्नालाल देसरडा, सत्यनारायण तोतला, कांतीलाल राठी, शिवकुमार बैजल, सुभाष अग्रवाल हे हजर होते. सूत्रसंचालन रागिणी कुलकर्णी यांनी केले तर आभार दरगड यांनी मानले.
लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 1:00 AM