शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

सोशल मिडिया, मोबाईलमुळे पती-पत्नीमध्ये वाढती भांडणे; भरोसा सेलमधील तक्रारीमधून उघड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:38 PM

जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे  प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे व्यसनाधीनता, संशयी वृत्तीसह मोबाईलचा अतिवापर पती-पत्नींमधील वादाचे प्रमुख कारण ठरत आहे. सासू-सासऱ्यांपासून अलिप्त राहण्याची मागणी यासह इतर विविध कारणांनी पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद

जालना : मोबाईलवर तास तास बोलणे, व्हाॅट्सॲप, फेसबुक आदी सोशल मीडियाचा वाढलेला वापर पती-पत्नींमधील भांडणाला फोडणी टाकत आहे. गत दोन वर्षांत भरोसा सेलमध्ये तब्बल १२६४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सामोपचारानंतरही समेट घडत नसल्याने त्यातील २४७ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.

जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे  प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनता, संशयी वृत्तीसह मोबाईलचा अतिवापर पती-पत्नींमधील वादाचे प्रमुख कारण ठरत आहे. येथील भरोसा सेलमध्ये सन २०१९ मध्ये ७४९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ४१३ प्रकरणांत समोपचारानंतर आपापसात तडजोड करण्यात आली. तडजोड होत नसल्याने २१६ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली. १९ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, १०१ प्रकरणे प्रलंबित आहेत, तर चालू वर्षात ५१५ प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील ७६ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली आहे. तडजोड होत नसलेली ३१ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत, तर १२ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, ३९७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणेसंशयी वृत्ती, व्यसनाधीनता, वाढलेला मोबाईलचा वापर, सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे, हुंड्याची मागणी, प्रॉपर्टीचा वाद, शेतजमिनीचे कारण, सासू-सासऱ्यांपासून अलिप्त राहण्याची मागणी यासह इतर विविध कारणांनी पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद वाढले आहेत. विशेषत: मोबाईलचा अतिवापर हा त्रासदायक ठरत असल्याचे चित्र भरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येत आहे.

४८९ प्रकरणांत समेटभरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींनुसार माहेर- सासरच्या मंडळींसह दाम्पत्यांमध्ये चर्चा घडवून आणली जाते. त्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेल्या संसारात पुन्हा हास्य फुलविण्याचे काम अधिकारी, कर्मचारी करतात. गत दोन वर्षांमध्ये भरोसा सेलकडून ४८९ प्रकरणांत आपापसात तडजोड करण्यात आली आहे.

मोबाईलचा वापर, संशयीवृत्ती, व्यसनाधीनता आदी कारणांमुळे पती-पत्नींमध्ये भांडणे होत असल्याचे आमच्याकडे दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येते. तक्रार दाखल झाल्यानंतर दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेला संसार पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.- एस.बी. राठोड, भरोसा सेलप्रमुख

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाFamilyपरिवार