लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. मस्तगड येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून एकता दौडला हिरवी झेंडी दाखवली.यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सिद्धीविनायक मुळे, डॉ. कैलास सचदेव, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, उपशिक्षणधिकारी मापारी, जिल्हा शल्य चिकित्सक एम. के. राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रबोधिनी अमृतवाड, पोलिस निरीक्षक चतुर्भुज काकडे केशव कानफुडे, भोरे, संपदा कुलकर्णी, छाया कुलकर्णी आदींनी वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलेएक भारत श्रेष्ठ भारतएक्सप्लोरर्स ग्रुपच्या वतीने यापूर्वीही गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू आॅफ युनिटी येथे १८२ फूट तिरंगा झेंडा नेऊन एकता दौड काढली होती. त्याच धर्तीवर जालन्यातही हा १८२ फूट तिरंगा संपूर्ण शहरातून मिरवणूक काढून एकता दौड पूर्ण केली. यावेळी १५० पेक्षा अधिक युवक, नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी विविध देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. युवकांच्या या विशेष प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत झाले.
शहरवासीयांचा एकता दौडमध्ये उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 1:08 AM