५२ जणांनी केले रक्तदान
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे डॉ. मोहम्मद बद्रोद्दीन यांच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन रांजणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना काळात राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. राज्य शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले होते. या आवाहनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी डॉ. मो. इरफान, सय्यद फहीम अली, असलम कुरेशी, शेख अब्दुल रहीम, मौलाना मुस्तकिम, अमोल पोटरे, कृष्णा वाघ आदी उपस्थित होते. बदनापूर येथील नूर हॉस्पिटलचे डॉ. सुफियान, शेख मौला अहमद, करामत खान, अझर कादरी, विवेक मोरे, शेख जमीर, जमील पटेल, इद्रीस पटेल, इम्रान पटेल आदींनी रक्तसंकलन केले. यावेळी दर तीन महिन्याला रक्तदान करणाऱ्या रांजणीवाडी येथील किशन पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वीतेसाठी सय्यद अजगर अली, रहीम कुरेशी, शोएब काजी, रईस इकबाल, शेख तौफिक, सय्यद रिजवान, शेख समीर, शेख नदीम, फरहान कुरेशी, मोईन तांबोळी, भारत जाधव, लक्ष्मण शिंगणे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो आहे