यावेळी ४५ वर्षावरील नागरिकांनी लस घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांमध्ये चांगल्या प्रकारची जनजागृती होत आहे. पहिल्यापेक्षा आता ४५ वर्षापुढील नागरिक स्वतः होऊन लस घेत आहे. त्यामुळे आता समाजातील प्रत्येक घटकांनी लस घेण्यास लोकांना प्रवृत्त करणे आवश्यक आहे. लसीकरणाबाबत जे काही गैरसमज पसरले आहे ते दूर होणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश देशमुख यांनी सांगितले. यावेळी कृषी सभापती विष्णुपंत गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश देशमुख, सरपंच बाबासाहेब गायकवाड, बळीराम शेंडगे, रामकीसन राठोड, रामेश्वर खंडागळे, ग्रा.पं. सदस्य शालीकराम माने, अशोक इंगळे, सोमनाथ बोडखे, सोमनाथ माने, शिवाजी देवकर, श्याम काळे, अनिल शिंदे, भानुदास इंगळे, नंदकुमार माळी, शिवाजी माने, दत्ता सेलकर, विठ्ठल साठे, महेश वाल्हेकर आदींची उपस्थिती होती.