दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या भिंतीं , दरवाजे तुटले असून, खेळण्यासाठी सुविधा नसल्याने या संकुलाची दुरवस्था झाली आहे. परिणामी, याकडे खेळाडूंनी पाठ फिरविली आहे.जिल्ह्यातील क्रीडा संकुलात बॅडमिटन, अॅथेलेटिक्स, क्रिकेट आदीं खेळाचे मैदाने आहे. येथे दररोज राष्ट्रीय, जिल्हास्तरीय खेळाडू खेळण्यासाठी येतात. परंतु मागील काही वर्षापासून या क्रीडा संकुलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. क्रीडा संकुलच्या मुख्य मैदानाच्या सर्वच भिंतींना तडे गेले असून, दरवाजेही तुटले आहे. मैदानातील फुटबॉलच्या खेळण्याच्या दांड्या वाकल्या असून, मैदानात सोयी सुविधांचा अभाव आहे. तसेच बॅडमिंटन मैदानालाही धुळीने व्यापले आहे. त्यामुळे ़येथे खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडंूनी या क्रीडा संकुलाकडे पाठ फिरवली आहे. येथे खेळाडूंसाठी मोठी जीम आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीमचे साहित्य धूळ खात पडले आहे. येथे या ठिकाणी काम करणाºया शिपायांनी आपले संसार थाठून ठेवले आहे. त्यामुळे या जीमकडे कोणीही जात नाही.विशेष म्हणजे, क्रीडा अधिका-यांना यांची माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाच्या अनास्थेमुळे क्रीडा संकुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:02 AM