लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आंतरराष्ट्रीय विटी दांडू (टीप कॅट) मध्ये भारताच्या खेळाडूंनी यश मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे. या संघात जालन्याचा सहा खेळाडूंचा समावेश होता, अशी माहिती आॅल इंडिया विटी-दांडू असोसिएशनचे सचिव प्रशांत नवगिरे यांनी दिली.३१ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१९ दरम्यान नेपाळ येथील काठमांडू येथे तिसरी जागतिक विटी-दांडू स्पर्धा पार पडली. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, मलेशिया आणि श्रीलंका या देशातील खेळाडूंचा समावेश होता. यामध्ये भारतीय संघामध्ये खेळणाऱ्यामध्ये सहा मुले, आणि एका मुलीचा समावेश होता. यावेळी प्रदीप पवार, अलीम शेख, कृष्णा पवार, गौरव नवगिरे, शिवाजी नवगिरे, प्रतीक्षा नवगिरे आदींचा समावेश होता.या सर्व विजयी खेळाडंूचे स्वागत विटू-दांडू संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. विटी-दांडू हा अस्सल भारतीय खेळ असून याला भारतामध्ये प्रामुख्याने लहान मुलामध्ये लोकप्रिय आहे. परंतु या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रशांत नवगिरे तसेच डॉ. उदय डोंगरे, संभाजी बादाड, विद्या नवगिरे, राज्यध्यक्ष गजानन वाळके, राकेश खैरनार, बप्पा म्हस्के यांनी प्रयत्न केले.
आंतरराष्ट्रीय विटी-दांडू स्पर्धेत जालन्यातील खेळाडू चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:06 AM