विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील रामनगर महसूल मंडळातील हडप येथे सोयाबीन आणि सोमनाथ येथे उडीद पीक कापणी प्रयोगाला स्वत: तालुका कृषी अधिकारी ए.टी. सुखदेवे यांनी उपस्थिती राहून प्रात्यक्षिक करून घेतले.हडप येथे नागोराव लकडे आणि गंगुबाई लकडे यांच्या शेतातील सोयाबीन या पिकावर कापणी प्रयोग घेण्यात आला. तालुका कृषी अधिकारी ए.टी. सुखदेवे यांनी सांगितले की, महसूल मंडळातून किमान दोन ठिकाणी कापणी प्रयोग घेण्यात येतो. रॅन्डमली शेतकरी निवडले जातात. या प्रयोगावर शेतकºयांसह इतर अनेक गोष्टीचा आढावा घेण्यात येतो. म्हणून पीक कापणी प्रयोगात विशेष काळजी घेतली जाते. कृषी अधिकाºयांसमोरच निवडलेल्या शेतकºयाच्या शेतातील प्रत्येकी अर्धा गुंठा क्षेत्रावरील सोयाबीनची सोंगणी कापणी करून त्याचा गठ्ठा बांधून मोजमाप केले. यानंतर लगेच मळणीयंत्रातून काढण्यात आले. तयार झालेल्या मालाचे वजन करून त्याची आकडेवारी घेण्यात आली. कृषी विभागातील कृषी सहायक संदीप उगले, आकाश वानखेडे, संबंधित कंपनीचे कर्मचारी यांनी जमीन क्षेत्र मोजमाप करणे तसेच स्वत: कृषी अधिकाºयांसोबत कापणीचा अनुभव घेतला. सोमनाथ येथे उगले यांच्या शेतावरील उडीदाची कापणी प्रयोग चाचणी घेण्यात आली. प्रत्यक्ष उडीद काठीने बडवून वाºयावर उफणून त्याचे मोजमाप विशिष्ट पद्धतीने करण्यात आले. पीक कापणी प्रयोगातून सोयाबीन, उडीदाचे आलेले वजन बघून कृषी अधिकाºयांनी चिंता व्यक्त केली.पाऊस नसल्याने खरीपाचे मोठे नुकसान झाले. आता रबीतील कमी पाण्यावर येणाºया पिकांची निवड शेतकºयांनी करावी, कृषी विभागाकडून रबी पिकाचे नियोजन करणे सुरू आहे, असेही कृषी अधिकाºयांनी सांगितले. यावेळी कृषी सहायक संदीप उगले, आकाश वानखेडे, शिवाजी लकडे, नागोराव लकडे, पवार यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.
सोयाबीन, उडीद पीक कापणी प्रयोगाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:38 AM
जालना तालुक्यातील रामनगर महसूल मंडळातील हडप येथे सोयाबीन आणि सोमनाथ येथे उडीद पीक कापणी प्रयोगाला स्वत: तालुका कृषी अधिकारी ए.टी. सुखदेवे यांनी उपस्थिती राहून प्रात्यक्षिक करून घेतले.
ठळक मुद्देरामनगर महसूल मंडळ : तालुका कृषी अधिकाऱ्यांसमोर पीक कापणीचे सादर केले प्रात्यक्षिक