विशेष म्हणजे सरकार मध्ये मंत्री असलेले विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळे हे मोर्चा काढून सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत. सरकारमधील मंत्री सरकार विरोधात मोर्चा काढत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
यावेळी त्यांना लॉकडाऊन, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई यावर विचारले असता, दानवे म्हणाले की, ज्यावेळी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर ईडीचे छापे पडले, त्यावेळी केंद्रात आमची सत्ता नव्हती. ज्या तपास यंत्रणा आहेत, त्यात आम्ही हस्तक्षेप करत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील ईडीच्या कारवाईनंतर धमकावणारे वक्तव्य केले त्या बद्दल विचारले असता, ते म्हणाले की, राऊत हे जेवढी चावी फिरवली तेवढेच ते बोलतात आणि ते कोणाच्या सांगण्यावरून बोलतात हे तुम्ही चांगलेच जाणून असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. संतोष दानवे, उपाध्यक्ष भास्कर दानवे आणि शहराध्यक्ष राजेश राऊत यांची उपस्थिती होती.