लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्या ऐवजी नियमांवर बोट ठेवून त्यांना वेठीस धरले जात आहे. चारा छावण्या सुरू करणे, रोजगार हमीची कामे वेळेत सुरू न करणे तसेच पाणी आणि चा-याची व्यवस्था करण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारविरूध्द जनतेत तीव्र नाराजी असल्याचे दिसून आले. बुधवारी काँग्रेसचे शिष्टमंडळ थेट शेतक-यांच्या बांधावर पोहोचले. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता पदाधिकाºयांनी चारा छावणी, रोजगार हमीच्या कामांना भेटी दिल्या.काँग्रेसच्या या शिष्ट मंडळात दुष्काळ निवारण समितीचे प्रमुख तथा माजी मंत्री बसवराज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, मराठवाड्याचे समन्वयक भीमराव डोंगरे, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, विजय कामड, माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी, राजेंद्र राख, विष्णू कंटुले, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद प्रा. सत्संग मुंढे आदींचा समावेश होता. काँग्रेसच्या वतीने दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी हे शिष्टमंडळ जालना दौºयावर आले होते.यावेळी त्यांनी प्रथम अंबड तालुक्यातील नांदी येथील चारा छापणीला भेट दिली. तेथे त्यांनी चारा छावणी चालकांशी संवाद साधला. यावेळी छावणी सुरू करण्यास विलंब झाल्याचे परिसरातील पशुपालकांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले. नांदी नंतर हे शिष्टमंडळ जालना तालुक्यातील धावेडी येथे गेले. तेथे त्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देऊन मजुरांशी संवाद साधला. यावेळी मजुरांनी त्यांच्या व्यथा मांडला.बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथेही या पदाधिकाºयांनी भेट दिली. कडेगाव येथे शेतकरी मेळावा घेऊन शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी कर्जमाफी, पीकविमा आणि अन्य मुद्यांवरून शेतकºयांमध्ये प्र्रचंड नाराजी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली. या शिष्टमंडळा सोबत डॉ.श्याम पांढरे, माजी नगरसेवक वैभव उगले, प्रकाश नारायणकर आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांची थट्टा केली : आम्ही ३५ हजार रूपये दिलेशेतकºयांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या फळबागा या २०१२ मध्ये दुष्काळात प्रति हेक्टरी ३५ हजार रूपयांची मदत केली होती. तसेच आठ दिवसात चारा छावणीला मंजुरी दिली जात होती. आताचे हे सरकार केवळ जुमलेबाज असून, सरकारला दुष्काळाची दाहकता कळत नसल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दुष्काळाचा आढावा घेणे म्हणजे शेतकºयांची एकप्रकारे थट्टा असल्याचे बसवराज पाटील यांनी सांगितले. यावेळी औताडे, जेथलिया, डोंगरे यांचीही भाषणे झाली. राजाभाऊ देशमुख यांनी जिल्ह्यातील सत्ताधारी मंडळींचे दुष्काळाकडे असलेले दुर्लक्ष गंभीर असल्याचे सांगून शेतक-यांचा तळतळाट या सरकारला लागल्या शिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यास असमर्थ -काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:13 AM