लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अमरावती विद्यापीठ अंतर्गत व्यंकटेश महाविद्यालय देऊळगावरजा येथे नुकत्याच झालेल्या 'सृजन २०१९' या प्रदर्शनात जेईएस महाविद्यालयातील पदवी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.या प्रदर्शनात प्रकल्प, पोस्टर व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत जेईएस महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाने निर्माण केलेला मॉस्कोट्रॅप प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.कमी खर्चात हा ट्रॅप तयार करून डास नियंत्रणात आणणे हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये आहे. महाविद्यालयाच्या सायन्स फोरमचे चेअरमन डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी सांगितले, की मॉस्कोट्रॅपसाठी कृत्रीम रासायनिक पदार्थ वापरले नसून नैसर्गिकरीत्या कार्बनडायआॅक्साइड खूप कमी प्रमाणात तयार करून डासांना आकर्षित केले जाऊन त्यांना ट्रॅप केले जाते. याचे सादरीकरण सोनाली कोलते या विद्यार्थिनीने केले. द्वितीय पारितोषिक ईश्वरी क्षीरसागर हिच्या प्रकल्पास मिळाले. तिने 'वायरलेस नोटिस बोर्ड' बनवला असून, त्यात मायक्रो कंट्रोलरचा वापर केला आहे. या सर्व प्रकल्पासाठी जे. ई. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. डी. काबरा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांना प्रा. रणजीत बायस, प्रा. श्रीनिवास सैंदर, प्रा. कुणाल टकले, डॉ. राजेश सरकटे, प्रा. गणेश रोकडे, प्रा. मनोज माहेर, प्रा. दीपा राठी, प्रा. किर्ती कुरील यांचे मार्गदर्शन मिळाले. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक श्रीनिवास भक्कड, पुरूषोत्तम बगडीया तसेच अन्य संचालकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.
'मॉस्को ट्रॅप' प्रकल्पास राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:22 AM