दरम्यान, यावेळी टोपे यांनी सांगितले की, हे इंजेक्शन मिळविण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. त्यामुळे अत्यंत विपरीत परिस्थितीत हा साठा मिळाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकूणच याचे वितरण आणि त्याचा काळाबाजार होऊ नये म्हणून दक्ष राहण्याचे निर्देश टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या कार्यक्रमास आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चन भोसले, अन्न व औषध प्रशासनाच्या उपायुक्त अंजली मिटकरी यांसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. येथील बंगलोर येथील कंपनीचे मुख्य वितरक बीरज मोतीलाल करवा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच यापुढेही सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
रुग्ण आणि रुग्णांचे हाल पाहवले नाहीत
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यलयात आढावा बैठक झाली. यावेळी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी मोबाईलवर तसेच प्रत्यक्ष भेटून रेमडेसिविरची जी मागणी केली; त्यामुळे आपण भावनिक झालो होतेा. आज लोकांकडे वाट्टेल ती किंमत मोजण्यासाठी पैसे आहेत, परंतु इंजेक्शन नव्हते. त्यामुळे आपण बंगलोरस्थित कंपनीशी बोलून हा दहा हजार इंजेक्शनचा साठा मिळवून घेतल्याचे मोठे समाधान असल्याचे टोपे यांनी सांगितले.