शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
2
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
3
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
4
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
5
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
6
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
7
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
8
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
9
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
11
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
13
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
14
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
15
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
16
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
17
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
18
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
19
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
20
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....

लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचा बुधवारी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:27 AM

लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भिल आदिवासी समाजाला आधार कार्ड, राशन कार्ड व ग्रामपंचायत पुराव्याच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.भिल आदिवासी समाजाला जात प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. आजवर यासाठी सतत पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने रास्तारोको आंदोलन करून प्रशासन, शासनाला जागे करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. भिल आदिवासी समाजाला आधारकार्ड, राशन कार्ड, ग्रामपंचायत पुराव्याच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, भिल आदिवासी समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.दरम्यान, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल विडंबन केल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांच्यासह रमेश दाभाडे, चंद्रकलाबाई गवळी, रमेश हाटकर, गोरख माळी, बाबासाहेब पाटोळे, गोपी घोडे, पांडुरंग नाटकर, भास्करराव कांबळे, सर्जेराव पाटोळे, अंबादास गायकवाड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाOBCअन्य मागासवर्गीय जाती