कारवाईची मागणी
परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीसह जुगार व इतर अवैध धंदे जोमात सुरू आहेत. अवैध धंद्यांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय युवापिढी व्यसनाधीन होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सूचना फलक गायब
बदनापूर : बदनापूर ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अनेक सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत आहे. शिवाय अपघात प्रवण क्षेत्रातील अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मोबाइलधारक त्रस्त
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाल्यानेे शासकीय, निमशासकीय कामांसह ऑनलाइन शिक्षणही ठप्प होत आहे.
धोकादायक पुलाकडे दुर्लक्ष
जालना : नवीन जालना भागातून जुन्या जालना, कसबा, गांधी चमन भागाला जोडणाऱ्या मार्गावरील कुंडलिका नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. खराब झालेले संरक्षक पाइप आणि खड्डे यामुळे पुलावर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.