लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी शनिवारी प्रत्येक विभागाची झाडाझडती घेतली. यात १८ कर्मचारी गैरहजर आढळून आले. लेटलतीफ व गैरहजर १४ कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. या झाडाझडतीनंतर लेटलतिफीला लगाम बसल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत बुधवारी कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले.जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हे पंचायत व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांच्या उपस्थितीबाबत हजेरी रजिस्टर, दौरा रजिस्टर, हालचाल रजिस्टरची पाहणी केली होती. तसेच प्रत्येक विभागात जाऊन कर्मचाºयांची संख्या मोजली होती. रजा, दौरा, कार्यालयीन कामकाज यासाठी गेलेल्या कर्मचाºयांच्या नोंदी तपासण्यात आल्या. या वेळी शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, सिंचन, सामान्य प्रशासन, आरोग्य इ. विभागातील कर्मचारी गैरहजर आढळून आले होते. गैरहजर कर्मचाºयांना नोटीस देण्यात आल्या. त्यानंतर सीईओ निमा आरोरा यांनीही दखल घेत अधिकारी आणि कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. शनिवारी घेतलेल्या या झाडाझडतीनंतर सोमवारपासून अधिकारी आणि कर्मचा-यांची संख्या कार्यालयीन वेळेत लक्षणीय आढळून आली. एरवी दौरा वा इतर कारणांच्या नावाखाली गैरहजर राहणारे कर्मचारी आवर्जृन उपस्थित राहत असल्याचे दिसून आले. अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याने विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाºया नागरिकांची कामे खोळंबतात. अनेकवेळा त्यांनी खेटे घालावे लागतात. याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून आले. यापूर्वी अनेकवेळा कर्मचाºयांना समज देण्यात आली. पण परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष खोतकर यांनी अचानक पाहणी करीत अधिकारी आणि कर्मचा-यांना निर्वाणीचा इशारा दिला. लोकांची लोकांसाठी असलेली ही संस्था टिकवायची असेल ती ग्रामीण भागातून येणाºयांची कामे वेळेतच पूर्ण व्हायला हवीत. यानंतर अधिकारी आणि कर्मचाºयांना शिस्त लागल्याचे दिसून आले. ही शिस्त किती काळ टिकून राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.अप-डाऊन करणाºया कर्मचाºयांचे काय ?जिल्हा परिषदेत काम करणारे बहुतांश कर्मचारी हे दररोज औरंगाबादहून अप-डाऊन करतात. सोयीच्या वेळेनुसार काम करणाºया कर्मचा-यांना आता कार्यालयीन वेळेनुसारच काम करावे लागणार आहे. अन्यथा प्रशासकीय कार्यवाहीला सामोरे जावे लागेल.प्रतीक्षा : सीसीटीव्ही, बायोमेट्रिकची...जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आणि बाह्य परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अधिकारी आणि कर्मचाºयांना वेळेचे बंधन असावे, या दृष्टीने बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. तरच सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे. प्रशासनाने या दृष्टीने तयारी करणे आता गरजेचे आहे.
झाडाझडतीनंतर लेटलतिफीला लगाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:51 AM