लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रदूषणमुक्त व स्वच्छ, सुंदर शहर संकल्पनेसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. शहरातील विविध भागातून जमा करण्यात येणाऱ्या कच-यातील प्लास्टिक वेगळे करणाºया तीन अत्याधुनिक मशीन जालना नगर पालिकेत दाखल झाल्या असून, या मशीनद्वारे प्लास्टिक वितळविले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.पालिकेत दाखल झालेल्या मशीनच्या कामाचे प्रात्यक्षिकाचा शुभारंभ सोमवारी नगराध्यक्षा गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. नगर पालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणा-या घनकचरा प्रकल्पांतर्गत शहरातून जमा करण्यात येणा-या कच-यातील प्लास्टिक, कॅरिबॅग वेगळे करुन सदर प्लास्टिक वितळवण्यासाठी जालना पालिकेने तीन अत्याधुनिक मशीन खरेदी केल्या आहेत. या मशीनद्वारे प्लास्टिक व कॅरिबॅग प्रेस करण्याचे प्रात्यक्षिक सोमवारी नगर पालिका परिसरात करण्यात आले.
प्रदूषणमुक्त, स्वच्छ शहर संकल्पनेसाठी प्रयत्नशील- संगीता गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:53 AM