शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हलाखीच्या परिस्थितीने संघर्ष शिकवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:44 AM

छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत व स्वामी विवेकानंदाना आदर्श मानून काम करायला सुरुवात केली, भारत विकास गु्रपच्या (बीव्हजी) माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हनुमंत गायकवाड आपले अनुभव सांगत होते.

ठळक मुद्देहनुमंत गायकवाड : अंबड येथे व्याख्यानातून सांगितला राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : लहानपणी आमच्या घरी वीज नव्हती. त्या वेळी ज्यांच्याघरी वीज आहे ते लोक खुप श्रीमंत असेल असे वाटायचे. हाल्लाखीच्या परिस्थितीने मला अपमान सहन करायला शिकवले. लहानपणी वडिलांसोबत एका व्याख्यानाला गेलो असता, तिथे व्याख्याते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्यावर व्याख्यान केले. त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत व स्वामी विवेकानंदाना आदर्श मानून काम करायला सुरुवात केली, भारत विकास गु्रपच्या (बीव्हजी) माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हनुमंत गायकवाड आपले अनुभव सांगत होते.येथील यशवंत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुफण्यासाठी व्याख्याते म्हणून त्यांनी रहीमतपूर ते राष्ट्रवादी भवन या प्रवासादरम्यानचे संघर्षमय अनुभव सांगितले. यावेळी सर्व सयोजन समीतील सदस्य व शहरातील मोठया संख्येने युवक, ज्येष्ठ, महिला, युवती यांची लक्षणीय उपस्थिती होती.गायकवाड म्हणाले, चौथीमध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे पुढील शिक्षणासाठी रहिमतपूर मधून थेट पुण्याला आलो. येथे दहावी झाल्यानंतर तंत्रनिकेतन मधून डिप्लोमा पूर्ण करत असताना आर्थिक परीस्थीती हलाखीची असल्यामुळे जॅम-सॉस विकले. पेंटींगचे काम केले. शिकवणी घेतली. १९ व्या वर्षी इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना मी भारत विकास ग्रुप या नावाने संस्थेची नोंदणी केली. पुण्यातील टेल्को कंपनीत नोकरीला लागलो. त्यावेळी कंपनीत अडीच कोटी रुपये किंमतीचे वायर पडून होते. त्याचा पुर्नवापर करुन मी कंपनीचे पैसे वाचवले. व्यवस्थापकीय संचालक यांनी मला बोलावून तुम्हाला काय हवे आहे, असे विचारले. मी गावाकडील मुलांना आपल्या कंपनीमध्ये नोकरी देण्याची विनंती केली. जागा नसल्याने त्यांनी स्वच्छतेसाठी जागा आहेत, तेथे काम करुन शकतात का, असे विचारले. ते काम माझ्या मित्रांनी ‘बीव्हीजी’मार्फत स्वीकारले. त्यानंतर आम्हाला अनेक कामे मिळत गेली. मी स्वप्न बघितले की, राष्ट्रपती भवनाचे काम आपल्याला मिळायळा हवे. आज हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व अभिवान आहे. आज राष्ट्रपतीभवन, पंतप्रधान निवास, लोकसभा, राज्यसभा केंद्र सरकारचे विविध कार्यालय तसेच मध्येप्रदेश, आंध्रप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र व देशातील विविध राज्यात बीव्हीजीच्या माध्यमातून अतिमहत्वाची रुग्णवाहिकासेवा, पोलिसांची वाहनसेवा, स्वच्छता सेवा पुरवली जाते. बीव्हीजी इतर देशांमध्येही सेवा पुरवत आहे. आज लाखो लोक या संस्थेते काम करत आहेत. यापुढेही मला राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन द्यावयाचा असल्याचे ते म्हणाले. कोणतेही काम छोटे नसते आपल्या कामातूनच आपली वेगळी ओळख निर्माण करावी. माझ्या यशामध्ये कुटुंबीयांसोबत माझ्यासोबत काम करणाºया प्रत्येक कर्मचाºयाचा वाटा असल्याचे ते आवर्जुन म्हणाले. रामेश्वर त्रिमुखे यांनी सूत्रसंचालन केले तर अ‍ॅड. कृष्णा शर्मा यांनी आभार मानले.