शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पिंपरखेड येथील विद्यार्थ्यांची नावे नासामार्फत जाणार मंगळ ग्रहावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:34 AM

नासाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मंगळरोव्हर २०२०’ मोहिमेंतर्गत अंतरीक्षयानातील स्टेन्सिल्ड चिपवर घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे कोरली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : नासाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मंगळरोव्हर २०२०’ मोहिमेंतर्गत अंतरीक्षयानातील स्टेन्सिल्ड चिपवर घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे कोरली जाणार आहेत. यासाठी शिक्षक निलेश चिमटे यांनी पुढाकार घेत आॅनलाईन पध्दतीने मराठीत नावांची नोंदणी केली आहे.नासा नॅशनल एरोनोटिक्स अ‍ॅड स्पेस अ‍ॅडमिनिस्टरेशनचे ‘मंगळरोव्हर २०२०’ हे अंतरीक्षयान लवकरच मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे. या यानातील स्टेन्सिल्ड चिपवर नावे कोरून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. मंगळ मोहिमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत ही मोहीम राबविली जात आहे.या मोहिमेंतर्गत पिंपरखेड (बु.) येथील विद्यार्थ्यांची नावेही कोरली जावीत, यासाठी केंद्र समन्वयक म्हणून काम करणारे तंत्रस्नेही शिक्षक निलेश चेमटे यांनी पुढाकार घेतला. या कामी मुख्याध्यापक बी.बी.भाग्यवंत यांनी त्यांना सहकार्य केले. चेमटे यांनी शाळेतील इयत्ता दुसरी वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांची नावे आॅनलाईन प्रक्रियेत मराठीमध्ये नोंदवित त्यांनी मराठी अस्मिातही जपली आहे. त्याचे आॅनलाईन बोर्डिंग पासही उपलब्ध झाले आहेत. शाळेतील उपक्रमशील शिक्षकामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच विविध नाविण्यपूर्व शिक्षण देण्यावर येथील शाळेतील शिक्षकांचा नेहमीच भर असतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे.२०२१ मध्ये यान पोहोचणार मंगळवार !रोव्हर २०२० हे यान ‘एॅटलस व्ही ५४१’ या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल येथील सैन्य दलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते ५ आॅगस्ट २०२० या कालावधीत लॉन्च केले जाणार आहे. हे यान २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळ ग्रहावर पोहचण्याची शक्यता असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.केसाच्या एक हजाराव्या भागा इतक्या रुंदीत कोरली जाणार विद्यार्थ्यांची नावेनासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या (जेपीएल) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या (७५ नॅनोमिटर) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे सामावण्याची क्षमता आहे. या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठविली जाणार आहेत.राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शननिलेश चेमटे तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करतात. तसेच राज्यातील शिक्षकांना व्हाटस्अ‍ॅपद्वारे मार्गदर्शन करतात. जालना जिल्हातून जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिकांनी आॅनलाईन पध्दतीने नावांची नोंदणी करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा, अवकाश संशोधन शास्त्राचा प्रचार करावा, असे आवाहन शिक्षक चिमटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

टॅग्स :Marsमंगळ ग्रहNASAनासाStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण