भोकरदन: भोकरदन येथील विजवीतरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता दिपक तुरे पाटील यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कंत्राटदाराकडून कामे मंजूर करून देण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे.
दिपक तुरे पाटील यांनी तालुक्यातील एका खाजगी कंत्राकदाराने चार कामे मंजूर करण्यासाठी 80 हजार रुपयांची मागणी केली. मात्र संबंधित कंत्राकदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खंबाट, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक लाप्रवि जालना, यांनी 26 डिसेंबर रोजी सापळा लावला यावेळी दिपक तुरे पाटील यांनी विजवीतरण कंपनीच्या कार्यालयात 4.30 वाजेच्या दरम्यान कंत्राकदारकडून 80 हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. ही कारवाई करण्यासाठी पोलिस कर्मचारी कृष्णा देठे, दयानेश्वर मस्के, गणेश बुजाडे, अजय चांदणे, यांनी परिश्रम घेतले.