जालना : जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांसह शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. प्रथम मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिवसेना तालुका शाखा
फोटो आहे
जाफराबाद : जाफराबाद शिवसेना तालुका शाखेच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बजरंग बोरसे, सखाराम मुरकुटे, प्रकाश दिवटे, दादाराव सरोदे, नारायण वैद्य, दत्ता बंगाळे, भय्या देशमुख, शिवाजी भिसे, शंकर भोपळे आदींची उपस्थिती होती.
——-
फोटो आहे
केदारखेडा गावात कार्यक्रम
केदारखेडा : येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रथम सूर्यभान जाधव व श्रीराम जाधव यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी संदीप शेळके, पंडित जाधव, गणेश तांबडे, बाळासाहेब करतारे, बालू जाधव, बाबासाहेब वराडे, रतन जाधव, रावसाहेब जाधव, गणेश कांबळे, बाबुराव जाधव, ज्ञानेश्वर जाधव, भाऊसाहेब जाधव, जगन मुरकुटे, आनंदा जाधव, अशोक शर्मा, बाबासाहेब राऊत, सुदाम जाधव, नारायण जाधव, जिजा जाधव, नायबराव जाधव आदींची उपस्थिती होती.
———————-
फोटो आहे
वालसावंगीत प्रतिमा पूजन
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुका संघटक किरणराजे कोथलकर, संदीप लोखंडे, गणेश दामधर, ताराचंद कोथलकर, राहुल कोथलकर, सखाराम कोथलकर, राजू जाधव, दीपक लाड, रामेश्वर भगत, लक्ष्मण कोथलकर, नारायण हिवाळे, भगवान पायघन, समाधान गवळी, मनीष अस्वार, अर्जुन कोथलकर आदींची उपस्थिती होती.
—————
राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल
जालना : शहरातील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुखदेव मांटे, रेवती मांटे, प्राचार्या लतिका मनोज यांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षिका फरहा शेख, एलीया गायकवाड, आमोल आधुडे, लक्ष्मी श्रीपत, वरुण अंबेकर, अन्सार सोलंकी, सचिन बोटवे, माधुरी तळेकर, गुंफा निकम, लक्ष्मी ठोकरे, नारायण मोरे आदींची उपस्थिती होती.
—————
फोटो आहे
राजर्षी शाहू विद्यालय, पारध
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील राजर्षी शाहू विद्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक विलास लोखंडे, निलेश लोखंडे, अनिल लक्कस, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर अल्हाट, विवेक पऱ्हाड, किशोर वाघ, विवेक अवसारमोल, भागवत पानपाटील, गजानन लोखंडे यांची उपस्थिती होती.