शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

'अचानक आमच्या अंगावर दगड पडायला सुरुवात झाली, पोलिसांनी सांगितलं जालन्यात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 11:23 PM

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला असून, आश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह आंदोलकही जखमी झाले आहेत. यात पोलिसांवर आंदोलकांनी लाठीचार्जचा आरोप केला आहे, तर आता दुसरीकडे पोलिसांवरही दगडफेक झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यातील काही पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका वृत्त वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत या पोलिसांनी आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. 

शैलेश बलकवडे जालन्याचे नवे SP; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर तात्काळ स्वीकारला पदभार

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  आम्ही नियंत्रण कक्षेतून जाताना व्यवस्थित गेलो. तिथे हॉस्पिटलाईज करण्यासाठी गेलो होतो, तिथे नेमकं काय होणार आहे याची माहिती नव्हती. समोर महिला होत्या म्हणून आम्हीही महिला समोर होत्या. अचानक दगडफेक सुरू झाल्यामुळे आम्ही जखमी झालो आहोत. समोरुन दगडफेक सुरू झाल्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्जची आम्हाला वरिष्ठांनी ऑर्डर दिली होती, अशी माहिती महिला पोलिसांनी दिली. 

एकुण ६४ पोलिस जखमी झाले आहेत. काही पोलिस घराजवळच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या अवस्थेतही हे पोलिस काम करत आहे, असंही पोलिसांनी सांगितलं. 

जालना येते झालेल्या हल्ल्यात पोलिसांसह नागरिकही उपचार घेत आहेत. 

शैलेश बलकवडे जालन्याचे नवे SP

पुणे येथील राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी रविवारीच दुपारी पदभार स्वीकारला आहे.   

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. ३१ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिस त्यांना आणण्यासाठी गेले होते. त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हवेत गोळीबारही करण्यात आला. याचे पडसाद राज्यभरात उमटले असून, अनेकठिकाणी जाळपोळ झाली. शिवाय, जालना शहरातही शनिवारी जाळपोळ झाली होती.

आंदोलनकांनी दगड फेक केली होती. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून, त्यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तर अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे आणि डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर लगेच शैलेश बलकवडे यांनी दुपारी पदभार स्वीकारला आहे.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिस