लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील रहिवासी महादेव गणाजी मुळीक यांच्या मालकीचा गोरी शिवारातील गट नंबर ७५ मधील एक हेक्टर ऊस ११ के.व्ही. च्या उच्च दाबाच्या ताराचे घर्षण होवून शॉर्ट सर्किटमुळे मंगळवारी मध्यरात्री जळुन खाक झाला.यामध्ये मुळीक यांचे आजच्या बाजार भावाप्रमाणे दोन ते आडीच लाखांचे नुकसान झाले. एक तर पावसाने पाठ फिरवली. त्यातच विहिरी बोरच्या पाण्यावर कसा तरी आत्तापर्यंत ऊस जगवला. ऊसातील तार सरळ करण्यासाठी वेळोवेळी महावितरण कंपनीला सांगण्यात आले. परंतु, महावितरण कपंनीच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक दिवसांपासून या परिसरातील विजेचे पोल वाकल्यामुळे व लोंबकळत असलेल्या तारांचे घर्षण होवून लाखो रुपयांचा ऊस जळुन खाक झाला.आग लागताच परिसरातील शेतकºयांनी विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग भयंकर असल्याने आग आटोक्यात आली नाही. या आगेत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शॉर्टसर्कीटमुळे ऊसाला आग; अडीच लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:50 AM