शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

गुन्हा दाखल झाला म्हणून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:34 AM

शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे लक्ष्मणनगर तांडा येथील एकाने शनिवारी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली

बदनापूर : शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे लक्ष्मणनगर तांडा येथील एकाने शनिवारी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह बदनापूर ठाण्यात आणल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.तालुक्यातील लक्ष्मणनगर तांडा येथील परमेश्वर मगन राठोड ( ३०) शनिवारी सकाळी विषारी द्रव प्राशन केले. नातेवाईकांनी त्यास तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. मृताच्या नातेवाईकांनी परमेश्वर राठोड यांच्या आत्महत्येस शिक्षक जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संतप्त ग्रामस्थांनी राठोड यांचा मृतदेह बदनापूर पोलीस ठाण्यासमोर ठेवल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांचा पवित्रा पाहून पोलिसांनी अंकुश राठोड यांच्या फिर्यादीवरून शिक्षक दत्तात्रय फटाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृत परमेश्वरने दोन वर्षांपूर्वी येथील जि.प. शाळेतील शिक्षक दत्तात्रय रंगनाथ फटाले (रा. कंडारी बु) याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. पैकी दोन महिन्यांपूर्वी एक लाख २० हजार रूपये परत केले. शुक्रवारी फटाले यांनी आणखी एक लाख रूपयांची मागणी करून तू पैसे दिले नाही तर तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली. बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बोलकर करीत आहेत---------काय आहे प्रकरण ?लक्ष्मणनगर तांड्यावरील शाळेतील शिक्षक दत्तात्रय रंगनाथ फटाले यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी परमेश्वर राठोडविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला होता. मुलीच्या गणवेशाचे पैसे का दिले नाही म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद होते.